हुज योर गायनॅक सीरिज प्रदर्शित
सबा आझाद ही बॉलिवूडमधील गुणवान अभिनेत्रींपैकी एक आहे. सध्या ती ऋतिक रोशनसोबतच्या डेटिंगवरून चर्चेत आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट करत ‘हूज योर गायनॅक’ अशी विचारणा केली आहे. सबा आझादच्या नव्या सीरिजचे हे शीर्षक आहे.
या सीरिजचा ट्रेलर शेअर करण्यात आला आहे. या वेबसीरिजमध्ये सबा आझाद एका डॉक्टरची भूमिका साकारत आहे. सीरिजमध्ये सामाजिक संदेशासह प्रेक्षकांना विनोदाची मेजवानी देखील मिळणार आहे. डॉक्टर विदुषी (सबा आझाद) स्वत:च्या विचारांद्वारे महिलांच्या वैयक्तिक आरोग्याशी निगडित जुन्या मानसिकतेला बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचे ट्रेलरमध्ये दिसून येते.
या सीरिजद्वारे केवळ महिलांमध्ये नव्हे तर पुरुषांमध्ये देखील जागरुकता वाढणार आहे. महिलांच्या वैयक्तिक आरोग्याला कधीच कमी लेखले जाऊ नये असे सबा आझादने म्हटले आहे. ही सीरिज अमेझॉन मिनी टीव्हीवर स्ट्रीम करण्यात आली आहे. या सीरिजचे दिग्दर्शन हिमाली शाहने केले आहे. द व्हायरल फीव्हरकडून निर्मित या सीरिजमध्ये सबा आझादसोबत करिश्मा सिंह आणि आरोन अर्जुन कौल मुख्य भूमिकेत आहे.









