वार्ताहर /जुने गोवे
स्वयं सहाय्य गटाच्या माध्यमातून महिलांनी एकत्रित येऊन दिवाडी बेटावर चतुर्थी चा बाजार भरविल्याने बेटावरील नागरिकांना लागणारया वस्तू, खाण्याचे पदार्थ करंज्या, चकल्या, लाडू तसेच माटोळीला लागणारे साहित्य बेटावरच खरेदी करता येईल ज्यामुळे नागरिकांचा वेळ व काही प्रमाणात पैसाही वाचेल असे प्रतिपादन कुंभार जुवा मतदार संघाचे आमदार श्री राजेश फळदेसाई यांनी केले.
गोवा राज्य ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत चौदा स्वयं सहाय्य गटाच्या महिलांनी एकत्रित येऊन सुरू केलेल्या, चतुर्थी बाजार’ च्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी सरपंच सुप्रिया सी. तारी, उपसरपंच स्वप्नलि भोमकर, पंचायत सदस्य मरिना वाझ व सब्द?श मांदेकर,सीआरपी सोनम भोमकर, अध्यक्ष भारती अ वाझ,सचिव रेश्मा दि. पार्सेकर, खजिनदार प्रशांति प्र.तारी,गट समन्वयक किरण पर्वतकर व इतर पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
सरपंच सुप्रिया सी तारी, उपसरपंच स्वप्नलि भोमकर,मरीना वाझ,सोनम भोमकर गट समन्वयक किरण पर्वतकर यांचीही समयोचीत भाषणे झाली. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला रितसर सुरवात झाली. अध्यक्ष भारती वाझ यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रज्योती रावळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर चतुर्थी पूर्वी तीन दिवस माटोळीचे सर्व सामान बाजारात उपलब्ध असेल असे सांगून सोनम भोमकर यांनी आभार प्रदर्शन केले.









