वृत्तसंस्था/ पाँटे व्हेड्रा (अमेरिका)
येथे सुरू असलेल्या प्लेअर्स चॅम्पियनशिप गोल्फ स्पर्धेत दुसऱ्या फेरीअखेर भारतीय वंशाचा तसेच अमेरिकेत स्थायिक असलेला गोल्फपटू साहित थिगेलाने दहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. त्याने दुसऱ्या फेरीमध्ये वन बोगी टू कार्ड 5 -67 गुणांची नोंद केली. पहिल्या फेरीअखेर थिगेला 37 व्या स्थानावर होता. दुसऱ्या फेरीअखेर वेंडहॅम क्लार्कने 65 टू बी 14- अंडर गुण नोंदवित आघाडीचे स्थान मिळविले आहे. शॉफेली दुसऱ्या तर कॅनडाचा टेलर तिसऱ्या स्थानावर आहे.









