बेळगाव : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री, भाजप नेते एस. एम. कृष्णा यांनी राजकीय निवृत्ती जाहीर केली आहे.
कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर असताना त्यांची ही निवृत्तीची घोषणा आश्चर्यकारक मानली जात आहे.
“माझं वय ९० वर्ष आहे, वयाचं भान ठेवायला हवं. ९० व्या वर्षी ५० वर्षाच्या माणसा सारखे वागू शकत नाही. त्यासाठी मी हळूहळू सार्वजनिक जीवनातून माघार घेत आहे,” असे एस. एम. कृष्णा म्हणाले.
माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा राजकारणातून पूर्णपणे निवृत्त झालेले नाहीत. “मी पूर्णपणे संन्यासी बनेन, असा नाही. पक्ष किंवा नेत्यांनी सल्ला मागितला, तर मी देईन,” असे त्यांनी स्पष्ट केले.