वाकरे । प्रतिनिधी
कोपार्डे (ता. करवीर) येथील स.ब.खाडे महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभाग व विद्यार्थिनी समुपदेशन समितीच्यावतीने पर्यावरण पूरक बीज राख्यांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.या प्रदर्शनात विद्यार्थिनींनी विविध प्रकारच्या बिया वापरून पर्यावरण पूरक राख्या बनवल्या आहेत.
वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्रा.दीपा पाटील यांनी प्लास्टिकसारख्या वेगवेगळ्या वस्तूंमुळे पर्यावरणाचा ऱ्हास आणि हानी होत असल्याचे सांगितले. यावर उपाय म्हणून प्रत्येकाने पर्यावरण पूरक वस्तूंचा वापर करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.याचाच एक भाग म्हणून वेगवेगळ्या बियांपासून विद्यार्थिनींनी राख्या बनवल्या आहेत,या राख्या जमिनीमध्ये विसर्जित केल्यानंतर त्यापासून रोपांची निर्मिती होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमांमधून विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव दिल्याचे त्या म्हणाल्या.
या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रभारी प्राचार्य डॉ. एस.बी.राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रा.एस.पी.चौगले, प्रा.डॉ.एस.के.पाटील,प्रा. डॉ.एम.टी.हजारे, प्रा.एस.एस.चौगले,प्रा.डॉ.डी.बी.माने प्रा.पी आर गुळवणी,इतर प्राध्यापक, विद्यार्थिनी उपस्थित होते.नियोजन सहकार्य वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्रा.प्रतिक्षा यादव यांनी केले. आभार पूजा पाटील हिने तर सूत्रसंचालन प्रा.ऐश्वर्या पाटील यांनी केले.









