वृत्तसंस्था/ निंगबो (चीन)
डब्ल्यूटीए टूरवरील येथे रविवारी झालेल्या निंगबो खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत इलिना रायबाकिनाने एकेरीचे जेतेपद पटकाविताना एकतेरिना अॅलेक्झांड्रोव्हाचा पराभव केला.
महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात रायबाकिनाने एकतेरिनाचा 3-6, 6-0, 6-2 अशा सेट्समध्ये पराभव केला. तृतीय मानांकीत रायबाकिनाने या सामन्यात 11 बिनतोड सर्व्हिसची नोंद केली. कझाकस्तानच्या रायबाकिनाचे 2025 च्या टेनिस हंगामातील हे दुसरे विजेतेपद आहे. अलिकडे तिने स्ट्रासबर्ग टेनिस स्पर्धा जिंकली होती. रायबाकिनाने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत आतापर्यंत डब्ल्यूटीए टूरवरील 10 स्पर्धा जिंकल्या आहेत. आता नोव्हेंबरमध्ये रियाद येथे होणाऱ्या 2025 च्या टेनिस हंगामातील अखेरच्या डब्ल्यूटीए फायनल्स स्पर्धेत स्थान मिळविण्यासाठी रायबाकिनाचे प्रयत्न चालू आहेत.
…..









