वृत्तसंस्था / रियाद
येथे सुरू असलेल्या डब्ल्यूटीए फायनल्स महिलांच्या टेनिस स्पर्धेत इलिना रायबाकिनाने पोलंडच्या इगा स्वायटेकचा पराभव करत प्रथमच या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली आहे.
रायबाकिनाने स्वायटेकचा 3-6, 6-1, 6-0 असा पराभव केला. तसेच अमंदा अॅनिसीमोव्हाने अमेरिकेच्या मॅडीसन किजवर विजय मिळविला. आता बुधवारी उपांत्य फेरीत स्थान मिळविण्यासाठी स्वायटेकचा सामना अॅनिसीमोव्हाबरोबर होणार आहे. 2025 च्या विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेत अंतिम फेरीत स्वायटेकने अॅनिसीमोव्हाचा 6-0, 6-0 असा एकतर्फी फडशा पाडला होता तर गेल्या सप्टेंबर महिन्यात झालेल्या अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अॅनिसीमोव्हाने स्वायटेकवर 6-4, 6-3 अशी मात केली होती. अॅनिसीमोव्हाने आपल्याच देशाच्या मॅडिसन किजचा 4-6, 6-3, 6-2 असा पराभव केला.









