सावंतवाडी प्रतिनिधी
मे . धर्मादाय सहआयुक्त कोल्हापूर विभाग यांच्या आदेशानुसार व सहा धर्मादाय आयुक्त कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या मार्गदशनाखाली बुधवार दिनांक १३ सप्टेंबर रोजी सावंतवाडी येथे संपन्न झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या नूतन कार्यकारी मंडळाची निवड एकमताने व उत्साहात पार पडली . सन २०२३ ते २७ या चार वर्षाच्या कालावधीसाठी निवडण्यात आलेल्या नवीन कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी श्री रुजारीओ पिंटो यांची एकमताने निवड करण्यात आली .उपाध्यक्षपदी -अजित पांडुरंग गोगटे व श्री दिलीप मोहन रावराणे यांची फेरनिवड तर तुषार उर्फ तुकाराम ना .साळगावकर यांची नव्याने उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली .कार्याध्यक्ष संजय जयकांत पेडणेकर कार्यवाहपदी श्री दिनेश वामन चव्हाण व खजिनदारपदी श्री मार्टिन झुजे अल्मेडा यांची फेरनिवड करण्यात आली .सहकार्यवाहपदी विजयकुमार गोपाळ सांळुखे आणि नितिन चंद्रकांत हडकर यांची नव्याने निवड करण्यात आली तर नुतन कार्यकारी मंडळाच्या सदस्यपदी श्री शैलेश मारुती नाईक , दत्तात्रय बाळकृष्ण पनवेलकर , श्री अनंत जानु गुरव ,अनिता शंकर सडवेलकर उर्फ शारदा गावडे ,संजय मधुकर सावंत ,नारायण अरुण कोठावळे यांची एकमताने निवड करण्यात आली . सर्वांच्या वतीने आजच्या सभेचे अध्यक्ष श्री दिलीप रावराणे यांनी नवनियुक्त अध्यक्ष श्री रुजारीओ पिंटो यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या .या प्रसंगी बोलताना पिंटो यांनी आपल्या सर्वांच्या सहकार्याने तसेच माजी आमदार तथा संघटनेचे उपाध्यक्ष श्री अजित गोगटे व उपाध्यक्ष दिलीप रावराणे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे कार्य अधिक जोमाने करेन , संघटनेला नवी दिशा देण्याचा आपला मानस असून,जिल्हा संघटनेच्या बळकटी बरोबरच प्रत्येक तालुका कबड्डी असोसिएशन यांना पाठबळ देण्या साठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत .जिल्ह्यामध्ये अधिकाधिक कबड्डी संघ ,खेळाडू कसे निर्माण होतील , जिल्ह्याचे किशोर, कुमार, खुला गट मुले मुली खेळाडूसाठी प्रशिक्षण व सराव शिबिरांचे आयोजन कसे करता येईल, खेळाडूंमध्ये शिस्तबद्धता कशी जोपासेल , जिल्हयातील पंचा साठी प्रशिक्षण व मार्गदशन शिबिरांचे तालुका निहाय वर्ग कसे आयोजित करता येईल यावर आपण विशेष लक्ष केंद्रीत करणार आहोत असे त्यांनी सांगितले . स्थापनेपासून जिल्हयातील कबड्डी खेळाच्या प्रसार व विकासासाठी कै. विलास रांगणेकर यांच्या बरोबरीने अथक परीश्रम घेणारे संस्थेचे माजी अध्यक्ष श्री . शशिकांत नेवगी यांचा आवर्जुन उल्लेख श्री पिंटो यांनी केला . लवकरच संस्थेचे आश्रयदाते व मार्गदर्शक तथा माजी अध्यक्ष श्री दिपक केसरकर यांची तसेच श्री माजी अध्यक्ष श्री शशिकांत नेवगी यांची संस्थेच्या पदाधिकार्यांना घेऊन आपण भेट घेणार आहोत व जिल्हयातील कबड्डी खेळाला अधिक पोषक वातावरण तयार करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे ते म्हणाले.









