ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Rutuja Latke’s lead continued in the second round अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरुवात झाली. पहिल्या आणि दुसऱ्या फेरीचे निकाल जाहीर झाले असून, त्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके आघाडीवर आहेत. त्यापाठोपाठ नोटा दुसऱ्या क्रमांकावर आहे.
पहिल्या फेरीत लटके यांना 4277 तर दुसऱ्या फेरीत 7817 मतं मिळाली. पहिल्या आणि दुसऱ्या फेरीतही त्यांनी मतांची आघाडी कायम ठेवली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या फेरीतील निकालानुसार नोटाला 1470, बाला नाडार- 339, मीना खेडेकवर- 185, राजेश त्रिपाठी- 127, फरहान सय्यद- 154, मिलिंद कांबळे- 136, तर मनोज नाईक यांना 223 मतं मिळाली.
अधिक वाचा : श्रीलंकेचा फलंदाज दनुष्का गुनाथिलकाला ऑस्ट्रेलियात अटक
या पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांचा विजय निश्चित मनाला जात आहे. कारण त्यांच्या विरोधात कोणत्याही मुख्य पक्षांनी आपला उमेदवार निवडणुकीत उतरवला नाही. त्या दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी आहेत.








