खंडेराजुरी / रवीकुमार हजारे :
फास्टरच्या दबावापुढे ऋतुजा झुकली नाही तिने प्राण सोडला पण धर्म वाचवला. तिच्या सासू-सासरे, नवऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून तो जलदगती न्यायालयात चालवावा यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ऋतुजाच्या आई-वडिलांची व ग्रामस्थांची गुंडेवाडी (ता. मिरज) येथे भेट घेऊन सांगितले.
यशवंतनगर कुपवाड येथील धर्मातराची बळी पडलेल्या गुंडेवाडी येथील ऋतुजाचा विवाह तीन ते चार वर्षांपूर्वी यशवंतनगर कुपवाड येथील सुकुमार राजगे यांच्याशी झाला होता. लग्नानंतर ऋतुजाच्या सासू-सासरे व नवऱ्याने ख्रिश्चन धर्म स्वीकार म्हणून तिच छळ केला. त्यामध्ये तिने आत्महत्या केली होती.
ऋतुजाच्या आई-वडिलांचे सांत्वन करण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर गुंडेवाडी येथे आले होते. तेव्हा त्यांनी धर्मांतरासाठी ऋतुजावर केलेल्या अत्याचाराचा पाढाच वाचला. कुटुंबाने लग्ग्रामध्ये हिंदू असल्याचे सांगितले लग्राच्या दुसऱ्या दिवशीच आपले रंग दाखवले. धर्म बदलासाठी दबाव टाकू लागले. हिंदू पूजा, चालीरीतीना सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकार म्हणून दबाव टाकू लागले, पण दबावाला ऋतुजा बळी पडली नाही सात महिन्यांची गरोदर असणाऱ्या ऋतुजावर त्या गर्भावर ख्रिश्चन संस्कार करण्यासाठी फास्टर सासू-सासरे, नवरा दबाव टाकू लागले. पण तिने डोहाळ जेवण हिंदू पद्धतीनेच करणार असल्याचे इच्छा व्यक्त केली. त्यानंतर फास्टर सतत घरी येऊन तिच्यावर दबाव टाकू लागला. त्यावर ऋतुजाने दबाव जुमनला नाही.
आमदार पडळकर पुढे म्हणाले, ऋतुजा देवपूजा, उपवास, संकष्टी है हिंदू सण करत असल्याने फास्टरच्या सांगण्याने सासू-सासरे नवऱ्याने छळ सुरू केला. ऋतुजा ही अहिल्याकन्या होती. ऋतुजाच्या व लहान गर्भाचे मारेकरी वर सदोष मनुष्य वयाचा गुन्हा दाखल करून खटला जलद गती न्यायालयात चालवावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले
त्यावेळी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, सरपंच रेखा गडदे, विठ्ठल ऐडके, आनंदा गडदे संपत पाटील, आनंदा पाटील, रमेश सुबराव पाटील, सागर घोडेस्वार, दिपाली खांडेकर, ऋतुजाचे वडील चंद्रकांत पाटील, आई सुनीता पाटील सह ग्रामस्थ उपस्थित होते.








