फिनलंड आणि स्वीडन या देशांनी नाटोमध्ये प्रवेश केल्यास रशिया ते खपवून घेणार नाही, असा गंभीर इशारा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिला आहे. शुक्रवारी ते पत्रकारांशी बोलत होते. फिनलंड आणि स्वीडन हे दोन देश दुसऱया महायुद्धापासून त्र्ययस्थ (न्यूट्रल) आहेत. मात्र युक्रेनवर रशियाने केलेले आक्रमण पाहता अशी वेळ या त्रयस्थ देशांवरही येऊ शकते. त्यामुळे त्यांना नाटोच्या पंखाखाली घेऊन त्यांच्या संरक्षणाचा मार्ग मोकळा करण्याची तयारी युरोपियन महासंघाने केली आहे. पण रशियाने खो घातल्याने पुढे काय करायचे हा प्रश्न आ वासून उभा आहे, असे आंतरराष्ट्रीय अभ्यासकांनी म्हंटले आहे.
फिनलंड आणि स्वीडन हे देश युपेनच्या पश्चिमेला आहेत. त्यांची सीमा युपेनला लागलेली नाही. मात्र, ती युक्रेनच्या नजीक आहे. रशियाकडून या देशांना आक्रमणाचा धोका निर्माण झाला आहे. या देशांनी नाटो मध्ये प्रवेश केल्यास प्रत्येक नाटो देशाला जे सुरक्षा कवच मिळते ते यांनाही मिळू शकते.
…तर अण्वस्त्रे प्रस्थापित करणार
फिनलंड आणि स्वीडन यांना नाटोमध्ये घेण्याचा निर्णय झाल्यास रशिया आपल्या पश्चिम सीमेवर अण्वस्त्रे प्रस्थापित करणार आहे असा इशाराही पुतीन यांनी दिला आहे. रशियाने तशी कृती केल्यास या भागात अणुयुद्धाचा धोका मोठय़ा प्रमाणात वाढू शकतो. एका प्रकारे हा एक न्यूक्लिअर फ्लॅशपॉइंट बनू शकतो. त्यामुळे युरोपियन देश आणि अमेरिका घाईगडबडीने कोणताही निर्णय घेणार नाहीत. सध्या त्यांची प्राथमिकता युद्ध थांबविणे आणि स्थिती पूर्वपदावर आणणे हे आहे. मात्र, भविष्यात फिनलंड आणि स्वीडन यांच्यासंबंधात या देशांना धोरण निर्धारित करावेच लागणार आहे. नजीकच्या भविष्यकाळात चित्र स्पष्ट होईल, असे मत आहे.









