वृत्तसंस्था/मॉट्रियल
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या नॅशलन बँक खुल्या पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत रशियाच्या पाचव्या मानांकित आंद्रे रुबलेव्हने अमाल्दीचा पराभव करत एकेरीची अंतिम फेरी गाठली. पावसामुळे या स्पर्धेतील उपांत्य फेरीचे सामने उशीरा खेळविण्यात आले.
26 वर्षीय रुबलेव्हने अमाल्दीचा 6-4, 6-2 असा पराभव केला. रुबलेव्हने चालु वर्षीच्या टेनिस हंगामात माद्रीद आणि हाँगकाँग येथील स्पर्धा जिंकल्या आहेत. रुबलेव्हचा अंतिम सामना ऑस्ट्रेलियाच्या पॉपीरिनशी होणार आहे. पॉपीरिनने उपांत्य सामन्यात अमेरिकेच्या सेबेस्टीयन कोर्दावर 7-6(7-0), 6-3 अशी मात करत अंतिम फेरी गाठली. रविवारी झालेल्या सामन्यात पॉपीरिनने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात हुरकेजचा 3-6, 7-6(7-5), 7-5 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली होती.









