वृत्तसंस्था / डोहा
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या कतार खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत रशियाच्या दहाव्या मानांकित आंद्रे रुबलेव्हने एकेरीची अंतिम फेरी गाठताना कॅनडाच्या ऑगेर अॅलिसीमेचा पराभव केला. रुबलेव्ह आणि ड्रेपर यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल.
उपांत्य फेरीच्या सामन्यात रुबलेव्हने अॅलिसीमेचा 7-5, 4-6, 7-6 (7-5) असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. या स्पर्धेमध्ये 2018 साली रुबलेव्हला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. तर 2020 साली रुबलेव्हने या स्पर्धेचे जेतेपद मिळविले होते. तब्बल तीन तास चाललेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत रुबलेव्हने अॅलिसीमेविरुद्ध 21 बिनतोड सर्व्हिसची नोंद केली. दुसऱ्या उपांत्य लढतीत 16 व्या मानांकित ड्रेपरने लिहेकाचा 7-6 (7-2), 6-3 असा पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळविले आहे.









