वृत्तसंस्था/ हॅले (जर्मनी)
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या हॅले ग्रासकोर्ट पुरूषांच्या खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेंत रशियाच्या डॅनिल मेदवेदेव्हने एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठताना इलिया इव्हासिखाचा पराभव केला.
गुरूवारी झालेल्या सामन्यात मेदवेदेव्हने बेलारूसच्या इव्हाशिखाचा 7-6 (7-4), 6-3 असा पराभव केला. गेल्या सहा दिवसांच्या कालावधीत मेदवेदेव्हने दुसऱयांदा इव्हाशिखाचा पराभव केला. मेदवेदेव्हला विजयासाठी दीड तास झगडावे लागले.









