वृत्तसंस्था/टोरँटो
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या नॅशनल बँक खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत रशियाच्या 11 व्या मानांकीत कॅरेन कॅचेनोव्हने एकेरीची अंतिम फेरी गाठताना जर्मनीच्या टॉपसिडेड व्हेरेवला पराभवचा धक्का दिला. उपांत्य फेरीच्या सामन्यात कॅचेनोव्हने अॅलेक्सझांडेर व्हेरेवचा 6-3, 4-6, 7-6 (7-4) असा पराभव केला. 29 वर्षीय कॅचेनोव्हने आतापर्यंत एटीपी टूरवरील 7 स्पर्धा जिंकल्या आहेत. आता अमेरिकेचा टेलर फ्रित्झ आणि बेन शेल्टन यांच्यात उपांत्य फेरीचा दुसरा सामना खेळविला जाणार असून या सामन्यातील विजयी खेळाडूबरोबर कॅचेनोव्हचा अंतिम सामना होईल. सध्या एटीपीच्या ताज्या मानांकनात कॅचेनोव्ह तिसऱ्या स्थानावर आहे. 2017 साली कॅचेनोव्हने ही स्पर्धा जिंकली होती. तर 2023 साली त्याने या स्पर्धेतील अंतिम सामन्यात इटलीच्या टॉपसिडेड जेनिक सिनेरचा पराभव केला होता.









