वॉरगेममध्ये नोंदविला होता विश्वविक्रम ः रशियाचा अचूक निशाणेबाज
रशिया आणि युक्रेन युद्धात मोठय़ा प्रमाणावर रशियाला नुकसान सहन करावे लागले आहे. रशियाची शस्त्रास्त्रs आणि विमाने नष्ट होण्यासाब्sातच त्याला स्वतःचे सैनिक गमवावे लागले आहेत. रशियाच्या बरोटिया येथील रहिवासी 25 वर्षीय बसानोव्ह देखील याच सैनिकांपैकी एक आहे. बाटो बसानोव टँक बायथलॉन वॉरगेममध्ये मागील वर्षी विक्रम मोडीत काढणाऱया पथकाचा तो सदस्य होता. संरक्षणमंत्री सर्गेई शोईगु आणि चीफ ऑफ द आर्मी जनरल स्टाफ वालेरी गेरासिमोव्ह यांच्या उपस्थितीत त्याने हा विक्रम केला होता. परंतु वॉरगेमध्ये जिंकणारा हा सैनिक खऱया युद्धात हरला आणि मारला गेला.
बरोटिया हा भाग रशियाच्या पूर्व हिस्स्यात असून तो मंगोलियाच्या सीमेवर आहे. बरोटिया भाग अत्यंत गरीब असल्याचे मानले जाते. बसानोव्हला मागील वर्षी टँकर बायथलॉनमध्ये वर्ल्ड चॅम्पियन झाल्याने गौरविण्यात आले होते. बसानोव्हने 80 किलोमीटरच्या वेगाने रणगाडा चालवून स्वतःच्या सर्व लक्ष्यांचा अचूक भेद केला होता. बाटो बसानोव्ह च्या मृत्यूमुळे टँक बायथलॉनमध्ये जिंकणे आणि खऱयाखुऱया युद्धात लढणे या दोन्ही गोष्टींमध्ये मोटा फरक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मागील वर्षी रशियाच्या टी-72बी3 टीमने टँक बायथलॉनमध्ये चीनसमवेत 19 देशांच्या सैनिकांना मागे टाकत सर्वोत्तम कामगिरी केली होती. बसानोव्ह याच टीमचा सदस्य होता आणि त्याला सध्या पुतीन यांचे युद्धप्रभारी गेरासिमोव्ह यांच्यासोबत पाहिले गेले होते. एका रशियन सैन्य तज्ञाने रणगाडय़ांचे आधुनिकीकरण न होण्यासाठी पुतीन सरकार जबाबदार असल्याचे म्हटले आहे.
बसानोव्ह रशियन एअर डिफेन्सच्या रायफल बिग्रेडमध्ये गनर होता. बसानोव्हचा मृतदेह त्याच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी 7 आठवडय़ांचा कालावधी लागला आहे. युक्रेनमध्ये सातत्याने रशियन कमांडरांचा मृत्यू पुतीन यांच्यासाठी मोठय़ा झटक्यापेक्षा कमी नाही. बसानोव्हच्या मृत्यूपूर्वी पुतीन यांना 9 जनरल गमवावे लागले आहेत.









