Russia Ukraine War: रशियाने युक्रेनवर मोठा क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. यात सॉल्व्हियनस्क शहरातील निवासी भागात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 21 जण जखमी झाले आहेत. युक्रेन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर अनेक नागरीकांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले. य़ावेळी रुग्णालयात नेत असताना रुग्णवाहिकेतच एका तरुणाचा मृत्यू झाला.
रशियाचा दावा आहे की जेव्हा त्याने सॉल्व्हियनस्कवर हल्ला केला तेव्हा उध्वस्त झालेल्या बाखमुतचे इतर जिल्हेही ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले जात होते. रशिया आणि युक्रेनमधील युद्धानंतर येथील मोठी लोकसंख्या येथून निघून गेली आहे. विशेष म्हणजे रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या वर्षी २४ फेब्रुवारीला युद्ध सुरू झाले होते. या वर्षभरात कधी रशिया तर कधी युक्रेनने या युद्धात वर्चस्व गाजवले. रशियाकडून युक्रेनचे बरेच नुकसान झाले आहे. पण अमेरिकेसह ‘नाटो’ देशांनी युक्रेनला लष्करी आणि आर्थिक मदत दिली, ज्याच्या जोरावर युक्रेनने एक वर्षाहून अधिक काळ लोटूनही रशियाच्या आव्हानाला सर्व प्रकारे तोंड दिले.
या युद्धामुळे रशियालाही खूप त्रास सहन करावा लागला आहे. पण रशियाकडून युद्ध संपण्याची शक्यता नाही. पुतीन यांनीही गरज पडल्यास अण्वस्त्रे वापरण्याची धमकी दिली होती.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









