वॅगनर’चे 25 हजार सैनिक सज्ज : प्रमुख येवगेनी प्रिगोझीन यांचा टेलिग्राम संदेश
मॉस्को / वृत्तसंस्था
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी चुकीची निवड केली आहे, अशी धमकी वॅगनर ग्रुपने दिली आहे. अशा स्थितीत त्याचा फटका त्यांना सहन करावा लागणार आहे. रशियात लवकरच नवा राष्ट्राध्यक्ष दिसेल, असेही वॅगनर समुहाने स्पष्ट केल्याने या इशाऱ्याकडे पुतीन यांना थेट आव्हान म्हणून पाहिले जात आहे.
आपले 25,000 सैनिक प्राण देण्यास तयार असल्याचे वक्तव्य रशियन खासगी लष्कर वॅगनरचे प्रमुख येवगेनी प्रिगोझीन यांनी केले आहे. आपले सर्व सैनिक रशियन सैन्याविऊद्धच्या कारवाईसाठी सज्ज आहेत, असे त्यांनी आपल्या टेलिग्राम संदेशात म्हटले आहे. सुऊवातीला 25,000 सैनिकांना सज्ज ठेवले जाणार असून त्यानंतर उर्वरित 25,000 सैनिक रशियन लोकांसाठी कठोर भूमिका घेण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
मॉस्को, व्होरोनेझमध्ये दहशतवादविरोधी आणीबाणी
वॅगनर समूहाच्या आक्रमक पवित्र्यानंतर मॉस्कोमधील प्रशासनाने शहरात दहशतवादविरोधी आणीबाणी घोषित केली आहे. शहर आणि मॉस्को प्रदेशात संभाव्य हल्ले रोखण्यासाठी दहशतवादविरोधी कारवायांची यंत्रणा स्थापन करण्यात आली आहे. मॉस्कोमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. युव्रेनच्या सीमेला लागून असलेल्या नैर्त्रुत्य रशियाच्या व्होरोनेझ प्रदेशातही अशीच आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. दहशतवादविरोधी आणीबाणीची स्थिती रशियन अधिकाऱ्यांना नियंत्रणे वाढविण्यास आणि नागरी अटकेची परवानगी देते. अशा स्थितीत टेलिफोन कॉल्स देखील अनेक वेळा टॅप केले जाऊ शकतात.
‘वॅगनर’विऊद्ध चौकशी सुरू
देशाच्या संरक्षण मंत्र्याला काढून टाकण्याची धमकी दिल्याबद्दल रशियन अधिकाऱ्यांनी शुक्रवारी वॅगनर ग्रुप खासगी सैन्याचे प्रमुख येवगेनी प्रिगोझीन यांच्याविऊद्ध फौजदारी तपास सुरू केला. प्रिगोझीन यांनी रशियाचे संरक्षणमंत्री सर्गेई शोईगू यांच्यावर युव्रेनमधील वॅगनर ग्रुप बेस पॅम्पवर रॉकेट हल्ल्याचा आदेश दिल्याचा आरोप केला. येथील बेस पॅम्पवर प्रिगोझीन यांचे सैनिक रशियाच्या बाजूने युव्रेनियन सैन्याशी लढत आहेत.
युव्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा हल्लाबोल
रशियात सुरू असलेल्या या बंडाचा आता युव्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी खरपूस समाचार घेतला आहे. रशियाची कमजोरी स्वाभाविक आहे. रशिया जितका जास्त काळ युव्रेनमध्ये आपले सैन्य ठेवेल, तितकी अराजकता, संकट त्यांच्या देशात पसरेल असे ट्विट झेलेन्स्की यांनी केले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी रशियातील परिस्थितीवर हे भाष्य केले आहे. दरम्यान, युव्रेनमध्ये रशियन लष्करी आक्रमण सुरूच आहे.
देशद्रोह्यांना परिणाम भोगावे लागतील : पुतीन
देशांतर्गत तणावानंतर राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी देशाला संबोधित केले आहे. रशियन अधिकारी रशियामध्ये आणखी विभाजन होऊ देणार नाहीत, लोकांचे संरक्षण केले जाईल, असे ते म्हणाले. आपण यासंबंधी सर्व विभागांच्या लष्करी कमांडर्सशी चर्चा केली असून सैन्य शौर्याने लढत आहे. युव्रेनमध्ये रशियन सैन्याच्या विशेष लष्करी कारवाईदरम्यान कोणत्याही मतभेदापासून दूर राहण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. वॅगनरचे प्रमुख येवगेनी प्रिगोझीन यांना लक्ष्य करताना त्यांनी अतिमहत्वाकांक्षेमुळे रशियाविऊद्ध देशद्रोह सुरू झाल्याचे ते म्हणाले.
उठावाच्या प्रयत्नासाठी जबाबदार असलेल्या सर्वांनी शिक्षा भोगण्याची आणि लोकांना उत्तर देण्याची तयारी ठेवावी, असेही पुतीन यांनी ठणकावले आहे. वॅगनरने कठीण काळात रशियाचा विश्वासघात करत सैन्याचा अवमान केला. सैन्याविऊद्ध शस्त्र उचलणारा प्रत्येकजण देशद्रोही आहे. प्रिगोझीनचे हे पाऊल म्हणजे रशियन लोकांच्या पाठीवर हल्ला करण्यासारखे आहे. वैयक्तिक स्वार्थापोटी त्यांनी पाठीत वार केले. रशिया आपल्या भविष्यासाठी पूर्ण ताकदीने लढत आहे. भविष्यात आमचे उत्तर आणखी कठोर असेल, असेही पुतीन पुढे म्हणाले.









