6 पट अधिक सैनिक ठार ः वोल्दोमिर झेलेंस्की यांचा दावा
रशिया-युक्रेन युद्धात दोन्ही देशांच्या हजारो सैनिकांचा मृत्यू झाला आहे. युद्धादरम्यान सुमारे 3 हजार युक्रेनियन सैनिक मारले गेले आहेत. तर रशियाला स्वतःचे 19 ते 20 हजार सैनिक गमवावे लागल्याचा अनुमान युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी व्यक्त केला आहे. सुमारे 10 हजार युक्रेनियन सैनिक जखमी झाले असून यातील किती जण वाचू शकतील हे सांगणे अवघड असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
रशियाचे सैनिक युक्रेनच्या नागरिकांना लक्ष्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. रशियाच्या सैन्याच्या माघारीनंतर युक्रेनची राजधानी कीव्ह क्षेत्रात 900 हून अधिक नागरिकांचे मृतदेह सापडले आहेत. मृतदेह रस्त्यांवर सोडण्यात आले होते किंवा तात्पुरत्या स्वरुपात दफन करण्यात आले हेते. 95 टक्के जणांचा मृत्यू स्नायपरच्या गोळीद्वारे झाल्याचा दावा कीव्हच्या क्षेत्रीय पोलीस दलाचे प्रमुख एंड्री नेबितोव्ह यांनी केला आहे.
दक्षिण भागात खेरसोन आणि जैपसोरिजियामध्ये रशियाचे सैन्य नागरिकांचा जीव घेत आहे. शासनात किंवा सैन्यात काम करणाऱया व्यक्तींना लक्ष्य करत असल्याचा आरोप झेलेंस्की यांनी केला आहे.









