गेल्या काही दिवसातील सर्वात मोठा हल्ला
कीव / वृत्तसंस्था
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला. रशियाने एकाच दिवसात 70 क्षेपणास्त्रे डागून युक्रेनमधील तीन शहरे उद्ध्वस्त केली. क्रिवी रिह भागात क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे एक निवासी इमारत कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला. तर खारसोन येथे गोळीबारात एका व्यक्तीला जीव गमवावा लागल्याची माहिती युपेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या कार्यालयातून देण्यात आली.
रशियाने युक्रेनच्या ईशान्येकडील राजधानी कीव आणि खार्किवमध्ये पुन्हा एकदा मोठय़ा प्रमाणात हल्ले सुरू केले आहेत. रशियन हल्ल्यांमुळे खार्किव आणि सुमीच्या प्रदेशात वीज खंडित झाल्यामुळे बहुतांश भागात ‘ब्लॅकआऊट’ झाले. निम्म्या देशातील वीजपुरवठा खंडित झाला असून आता फक्त रुग्णालये, पाणीपुरवठा यंत्रणा आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्रांनाच वीजपुरवठा केला जाणार असल्याचे एका अधिकाऱयाने सांगितले. या हल्ल्यानंतर आता कडाक्मयाच्या हिवाळय़ात शेकडो लोक विजेशिवाय राहत असून क्षेपणास्त्रांमुळे इमारतींचेही नुकसान झाले. लोकांनी मेट्रो स्टेशन, बंकर आणि पार्किंग लॉटमध्ये लपून रात्र काढली. त्याचबरोबर हल्ल्यावेळी अनेकांनी भीतीच्या छायेखाली बचावासाठी प्रयत्न केल्याचे अनेक छायाचित्रांमधून दिसून येत आहे.









