वृत्तसंस्था/ बुडापेस्ट
एफ-1 मोटर रेसिंग क्षेत्रातील येथे रविवारी होणाऱ्या हंगेरी ग्रा प्रि शर्यती पूर्वीच्या शुक्रवारी झालेल्या सराव सत्रामध्ये मर्सिडिज चालक जॉर्ज रसेलने पोल पोझिशन पटकावले.
या सराव सत्रामध्ये रेड बुल संघाचा सर्जिओ पेरेझ याच्या मोटारीला अपघात झाला. या सराव सत्रावेळी पावसाचा अडथळा आल्याने स्पर्धकांना आपल्या वाहनावर नियंत्रण ठेवणे अवघड जात होते. मर्सिडीज चालक ऑस्ट्रेलियाचा प्लास्ट्री याला ब्रिटनच्या जॉर्ज रसेलने मागे टाकले. त्यामुळे प्लास्ट्री दुसऱ्या स्थानावर तर अॅस्टोन मार्टीन तिसऱ्या स्थानावर राहिला.









