ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मविआच्या काळात बदली करून देण्यासाठी ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्या मुलाने पैसे घेतल्याची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खैरे यांचा मुलगा ऋषिकेश (Rushikesh Khaire) हा युवासेनेचा पदाधिकारी आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्याने वनविभागातील बदलीसाठी एकाकडून 2 लाख रुपये घेतले होते. मात्र, बदलीचे काम न झाल्याने संबंधित व्यक्ती त्याच्याकडे पैसे परत मागत असल्याचे संभाषण या क्लिपमध्ये आहे.
एका व्यक्तीची वन विभागात बदली करून देण्यासाठी ऋषिकेश खैरे यांनी 2 लाख रुपये घेतले होते. मात्र, दोन वर्ष उलटली तरीदेखील बदलीचे काम झालेले नाही, त्यामुळे संबंधित व्यक्ती ऋषिकेश खैरे यांना पैसे परत मागत आहे. मी घरातील सोने-चांदी विकून तुम्हाला 2 लाख रुपये दिले होते, तुम्ही कामही केले नाही आणि पैसेही परत देत नाही. मी खूप अडचणीत आहे, तुम्ही मला हलक्यात घेत आहात, आता एकच तारीख सांगा आणि माझे पैसे परत द्या, अशी मागणी सदर व्यक्ती करत आहे. त्यावर ऋषिकेश खैरे त्या व्यक्तीला डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात तुला शंभर टक्के पैसे देतो, असे आश्वासन देतात. हा सगळा संवादया व्हायरल ऑडिओमध्ये आहे. विशेष म्हणजे ऋषिकेश खैरे यांनी देखील पैसे घेतल्याचे मान्य केले आहे.
अधिक वाचा : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा जळगाव दौरा रद्द