वर्षभरात बेपत्ता झालेल्या सातहून अधिक जणांचा अद्याप शोध नाही
बेळगाव : बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातून गेल्या वर्षभरात बेपत्ता झालेल्या सातहून अधिक जणांचा अद्याप शोध लागला नाही. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पुन्हा एकदा प्रयत्न सुरू केला आहे. 15 जानेवारी 2022 रोजी सायंकाळी 7 पासून वाघवडे येथून सपना अजय चव्हाण (वय 22) मूळची रा. राईखेडा, ता. जिंतूर, परभणी ही तरुणी बेपत्ता झाली आहे. यासंबंधी तिच्या वडिलांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. तर खादरवाडी येथील हरिश काशिनाथ पारनट्टी (वय 40) हा युवक 10 ऑगस्ट 2022 च्या सकाळी 9 ते सायंकाळी 6.30 या वेळेत बेपत्ता झाला आहे. मारुती गल्ली, अवचारहट्टी येथील केदारी विठ्ठल सुळेभावी (वय 65) हा वृद्ध 15 एप्रिल 2022 च्या सकाळी 11 वा. बेळगावला जाण्याचे सांगून घराबाहेर पडला आहे. तो अद्याप घरी परतला नाही. भगतसिंग गल्ली, पिरनवाडी येथील महिला रेणुका बाळेश कल्लट्टी (वय 30) किशोर (वय 7), काव्या (वय 5) या आपल्या दोन मुलांसह 22 मार्च 2022 पासून बेपत्ता झाली आहेत. सुळगे (ये.) येथील यल्लाप्पा मोनाप्पा टक्केकर (वय 75) हा वृद्ध 15 नोव्हेंबर 2021 पासून बेपत्ता आहे. या सर्व प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आले आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पुन्हा प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांच्याविषयी कोणाला माहिती मिळाल्यास 0831-2405252 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.