अध्ययनातून खुलासा : केवळ शहरांपुरती समस्या नाही
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मानसिक आरोग्याशी निगडित समस्यांना सर्वसाधारणपणे श्रीमंतांचे आजार म्हटले जाते. परंतु एका नव्या अहवालातून आता मानसिक आरोग्याची समस्या आता ग्रामीण भारतातही पसरू लागली असल्याचे समोर आले आहे. ग्रामीण भारतात एंक्झाइटीचे रुग्ण वाढले असून यात संशोधनात जवळपास 45 टक्के लोकांनी आपण एंक्झाइटीचा सामना केला असल्याचे म्हटले गेले आहे.
ग्रामीण भारतात आरोग्य देखभालीची स्थिती-2024 च्या अहवालानुसार अलिकडच्या वर्षांमध्ये भारतात मानसिक आरोग्याच्या मुद्द्याची व्यापकता सातत्याने वाढत आहे, यामुळे सार्वजनिक आरोग्य चिंता वाढत आहे. या अहवालात 21 राज्यांमधील एकूण 5389 घरांना सामील करण्यात आले आहे.
या संशोधनाचा प्रमुख निष्कर्ष मानसिक आरोग्याशी संबंधित होता. यातून ग्रामीण भारतात एंक्झाइटीचा स्तर वाढला असल्याचे समोर आले आहे. तेच यामुळे आता हा केवळ शहरी मुद्दा राहिला नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. ग्रामीण भारतातील 73 टक्के ज्येष्ठ नागरिकांना सातत्याने देखभालीची गरज असल्याचेही या सर्वेक्षणात दिसून आले.
वृद्धांमध्ये एंक्झाइटी अधिक
संशोधनातून 45 टक्के लोकांना बहुतांश काळ एंक्झाटइाr असते, जी त्यांच्या मनस्थितीला प्रभावित करत असल्याचे समोर आले. तर डाटातून एंक्झाइटी युवा लोकांच्या तुलनेत वृद्ध लोकांच्या मानसिक आरोग्यावर अधिक प्रभाव पाडत असल्याचे समजते. या सर्वेक्षणात 18-25 वयोगटातील 40 टक्के लोकांनी एंक्झाइटीची बाब मान्य केली आहे. तर 60 टक्के आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांमध्ये हे प्रमाण वाढून 53 टक्के इतके राहिले आहे.









