सावंतवाडी प्रतिनिधी
मळगाव येथील एका गृहनिर्माण प्रकल्पाच्या घरपट्टी आकारणीसाठी 40 हजार रुपयाची लाच घेताना मळगाव ग्रामपंचायतचे प्रभारी ग्राम विकास अधिकारी ज्ञानदेव चव्हाण यांना इन्सुली येथे लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्याने रंगेहाथ पकडत कारवाई केली.चव्हाण हे इन्सुली ग्रामपंचायत मध्ये ग्राम विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. मात्र त्यांच्याकडे गेल्या काही महिन्यापासून मळगाव ग्रामपंचायतचा कारभार सोपवण्यात आला होता.मळगाव येथील एका गृहनिर्माण निर्माण प्रकल्पातील घरासाठी घरपट्टी संदर्भात कागदपत्र करण्यासाठी त्यांनी चाळीस हजार रुपयांचा तगादा लावला होता. दरम्यान,आज इन्सुली येथे त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. अधिक तपासासाठी त्यांना सावंतवाडी पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते अशी माहिती लाच लुचपत अधिकारी श्री पांचाळ यांनी दिली.









