सावंतवाडी | प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांची हक्काची बँक आहे. या बँकेत जर काही घोटाळा झाला असेल तर त्याचे सर्व पुरावे माजी आमदार राजन तेली यांच्याकडे आहेत . त्यांनी ते पुरावे माझ्याकडे सुपूर्त करावे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला घेऊन आपण रस्त्यावर उतरेन असे प्रतिपादन ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी सावंतवाडी येथे केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची फसवणूक होता कामा नये.राजन तेलींनी चार पक्षात प्रवेश करून झाल्यानंतर आता पाचव्या पक्षात प्रवेश केला. हा प्रवेश करण्यामागे त्यांचे काही सेटलमेंट झाले आहे का याची उत्तरे त्यांनी जनतेला द्यावीत असे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. राजन तेली यांनी जनतेच्या हितासाठी नव्हे तर स्वार्थासाठी चार वेळा पक्ष प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षनिष्ठ आणि प्रामाणिकपणाबद्दल सिंधुदुर्गवासीयांना काय ती कल्पना आहे. त्यांनी गेल्या घरी सुखी राहावे एवढीच अपेक्षा. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष आता होऊ घातलेल्या नगरपालिका ,जिल्हा परिषद ,पंचायत समिती निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे . आम्ही स्वबळाच्या दृष्टीने तयारी केली आहे. पण, जर का महाविकास आघाडी मधील काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेना पक्ष या सर्वांच्या विचारधारेतून जिंकण्याचा फॉर्मुला ठरवूनच निर्णय घेतला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.









