सांगे : सांगेतील संगमपूर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला यंदा साठ वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्ताने मोठ्या उत्साहात गणेश चतुर्थी सण साजरा करण्याचा संकल्प नवीन समितीने सोडला आहे. ऊपेश रत्नाकर नाईक यांच्या अध्यक्षतेखाली 2023-24 सालाकरिता नवीन समितीची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी प्रसाद नाईक, संजय रायकर, सुशांत नाईक, तर सचिव म्हणून लक्ष्मण नाईक आणि खजिनदार म्हणून तुषार करमळकर यांची निवड करण्यात आली आहे. उपसचिवपदी गुऊनाथ नाईक, उपखजिनदारपदी दुर्गेश सांगेकर आणि सदस्य म्हणून रामकृष्ण गुरव, संगमेश्वर नाईक, विद्धेश तारी, निखील डांगी, शेखर नाईक, रोहित नाईक, संकल्प डांगी, अंकुश गावस व प्रमेय करमळकर यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय सल्लागार, कार्यक्रम, निधी, देणगी कूपन, पूजा, मंडप सजावट, स्मरणिका, अल्पोपहार, कायदा, प्रसिद्धी आणि विसर्जन अशा विविध समित्यांची निवड करण्यात आली आहे.
Previous Articleक्युरेटर डॉ.तांडेल यांच्या ‘अविस्मरणीय देशाटन’ पुस्तकाचे प्रकाशन
Next Article मडगावातील ‘रिंग रोड’चे काही भाग खचण्याचे प्रकार
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









