नवी दिल्ली
अमेरिकन चलनाच्या तुलनेत रुपया 10 पैशांच्या वाढीसह 81.72 प्रति डॉलरवर खुला झाला. इतर जागतिक चलनांच्या तुलनेत डॉलरची घसरण आणि देशांतर्गत शेअरबाजारातील मजबूत कल यामुळे रुपया मजबूत झाला.
फॉरेक्स ट्रेडर्सच्या मते, विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची भांडवली गुंतवणूक आणि कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 80 डॉलरच्या खाली भाव घसरल्यानेही रुपयाला आधार मिळाला आहे. परकीय चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया 10 पैशांनी वाढून 81.72 वर खुला झाला. शुक्रवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 81.82 वर बंद झाला. महाराष्ट्र दिनानिमित्त सोमवारी परकीय चलन बाजार आणि शेअर बाजार बंद होते.









