वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय रुपया चलनाने 23 डिसेंबर रोजी त्याच्या सार्वकालिक नीचांकी पातळीला स्पर्श केला. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत त्याचे अवमूल्यन 07 पैशांनी झाले आणि 85.11 या सर्वकालीन नीचांकी पातळीवर बंद झाला. यापूर्वी 19 डिसेंबर 2024 रोजी डॉलरच्या तुलनेत रुपया 85.08 वर बंद झाला होता.
तज्ञांच्या मते डॉलरची मजबूती आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे ही घसरण झाली आहे. विदेशी चलन व्यापाऱ्यांनी भारतीय रुपयाच्या घसरणीचे श्रेय अमेरिकन डॉलरची मजबूत मागणी आणि भू-राजकीय अनिश्चिततेमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ यांना दिली.
खरंतर, गेल्या आठवड्यात यूएस मध्यवर्ती बँक, फेडरल रिझर्व्हने 2025 मध्ये दोनदा व्याजदरात कपात केली. यानंतर, डॉलर निर्देशांकाने 0.38 टक्क्यांनी वाढ नोंदवत 107.75 वर मजबुती मिळवली आहे.
आयात महाग होणार
रुपयाचे अवमूल्यन म्हणजे भारतासाठी वस्तूंची आयात महाग करावी लागते. याशिवाय विदेशात फिरणेही महाग झाले आहे. समजा डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 50 होते तेव्हा अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांना 50 रुपयांना 1 डॉलर मिळत असे. आता विद्यार्थ्यांना 1 डॉलरसाठी 85.06 रुपये खर्च करावे लागतील. यामुळे शुल्कापासून ते निवास, भोजनसाठीचा खर्च वाढणार आहे.









