म्हाकवे वार्ताहर
हदनाळ येथील धावपटू विशाल तुकाराम शेटके याची आंतरराष्ट्रीय एशियन स्पर्धेसाठी थायलंड येथे निवड झाली. नेपाळ येथे झालेल्या 3000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत भारताकडून खेळताना विशाल शेटके याने सुवर्णपदक प्राप्त केले. आता त्याची निवड एशीयन स्पर्धेसाठी थायलंड येथे झाली आहे.
नेपाळ येथे झलेल्या स्पर्धेत एकूण 22 स्पर्धक सहभागी झाले होते यातील नेपाळचे 19 स्पर्धक होते. तर आपल्या देशातील 3 स्पर्धक स्पर्धक सहभगी झाले होते .यापूर्वी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्याला सुवर्ण पदक प्राप्त झाले होते.दिल्ली येथे देशभरातील ऐकून 38 धावपटू सहभागी झाले होते. विशालला व्यावसायीक प्रशिक्षकाचे कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन मिळालेले नाही तो गावातच 2.30 ते 3 तास प्रॅक्टिस सराव करत होता त्याला त्याचे आई-वडील आजोबा यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले. त्याच्या या निवडीमुळे परिसरात कौतुक होत आहे.
अधिक वाचा- मधमश्यांच्या हल्ल्यात मेंढोली येथील वृद्धाचा मृत्यू
Previous Articleभाजपचे आमदार आनंद मामनी यांचे निधन मोदींनी व्यक्त केले दुःख
Next Article शिंदे गटाचे 22 आमदार नाराज; भाजपात विलीन होणार?









