बेळगाव : धारवाड सार्वजनिक शिक्षण खात्याच्यावतीने आयोजित बेळगाव विभागीय हँडबॉल स्पर्धेत माध्यमिक मुलांच्या गटात संत मीरा शाळेने उपविजेतेपद पटकाविले. धारवाड येथील मल्लसजन व्यायाम शाळेच्या मैदानावर नुकत्याच झालेल्या विभागीय हँडबॉल माध्यमिक मुलांच्या गटातील उपांत्य सामन्यात संत मीरा बेळगांवने धारवाड जिल्ह्याचा 10-9 असा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम लढतीत हावेरी जिल्ह्याने संत मीरा बेळगावचा 13-9 अशा गोल फरकाने पराभव करीत विजेतेपद पटकाविले. तर संत मीरा शाळेला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून धारवाडचे जिल्हा शिक्षणाधिकारी एस. एस. केळदीमठ, गटशिक्षणाधिकारी अशोक सिंदगी, निवृत्त धारवाड जिल्हा शारीरिक शिक्षण अधिकारी बी. जी. तोगरी, गिरीष मठपती या मान्यवरांच्या हस्ते उपविजेत्या संत मीरा संघाला चषक देऊन गौरविण्यात आले. या संघात अभिषेक गिरीगौडर, लिंगेश नाईक, निशांत शेट्टी, सिध्दांत वर्मा, प्रणव चौगुले, प्रसाद दिंडे, विघ्नेश दिवटे, श्रीनाथ सांबरेकर, प्रथमेश शहापूरकर या खेळाडूंचा समावेश होता. शाळेचे क्रीडा शिक्षक सी. आर. पाटील, मयुरी पिंगट, प्रशिक्षक यश पाटील, शिवकुमार सुतार, चंद्रकांत तुर्केवाडी यांचे मार्गदर्शन लाभले तर शाळेचे अध्यक्ष परमेश्वर हेगडे, प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव व पालक वर्गाचे प्रोत्साहान लाभत आहे.









