वृत्तसंस्था /लंडन
एटीपी टूरवरील येथे सुरु असलेल्या क्विन्स क्लब ग्रासकोर्ट पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत डेन्मार्कच्या होल्गेर, रुने तसेच ब्रिटनच्या टॉप सिडेड कॅमेरुन नुरीने एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. रुनेने पेन्स्टिनचा तर नुरीने ऑस्ट्रेलियाच्या थॉमसनचा पराभव केला. रुनीने पेन्स्टिनचा 6-3, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले. रुनी आणि मुसेटी यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळविला जाईल. या स्पर्धेत प्रथमच रुनीने आपला सहभाग दर्शविला आहे. 3 जुलैपासून सुरु होणाऱ्या विंब्लडन ग्रँडस्लॅम स्पर्धेपूर्वीची ही शेवटची सरावाची स्पर्धा आहे. दुसऱ्या एका सामन्यता अमेरिकेच्या सेबेस्टियन कोर्दाने आपल्या देशाच्या टिफोईवर 7-6 (7-2), 6-3 अशी मात करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. ब्रिटनच्या टॉप सिडेड कॅमेरुन नुरीने ऑस्ट्रेलियाच्या जॉर्डन थॉमसनचे आव्हान 4-6, 6-3, 6-2 असे संपुष्टात आणत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले. गेल्या वर्षी विंब्लडन टेनिस स्पर्धेत 27 वर्षीय नुरीने उपांत्यफेरीपर्यंत मजल मारली होती.









