चंदूर, वार्ताहर
Kolhapur : हातकणंगले तालुक्यातील मौजे रुई गावची जानेवारी २०२१ मध्ये पंचवार्षिक निवडणुक पार पडली होती. यामध्ये विद्यमान सरपंच करिष्मा मुजावर यांच्या राजश्री शाहू विकास आघाडीला ११ जागा मिळाल्या होत्या तर विरोधी परिवर्तन महाविकास आघाडीला सहा जागा मिळाल्या होत्या.
रुई ग्रामपंचायतीचे सरपंचपद इतर मागास महिलांसाठी आरक्षित होते. यातूनच विद्यमान सरपंच सौ.करिष्मा मुजावर यांना संधी देण्यात आली होती परंतु त्यांचा जातीचा दाखला बनावट असल्याची तक्रार विरोधी गटातील दीपक साठे यांनी केली होती.याबाबत सुरवातीला दोन्ही बाजूंची म्हणणे ऐकून घेऊन सुनावणी झाली असता जात पडताळणी मध्ये त्यांचा दाखला अवैध ठरविण्यात आला होता.
याबाबतचे निकालाचे पत्र दिनांक ८ ऑक्टोबर २०२१ रोजी प्राप्त झाले होते. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात सरपंच करिष्मा मुजावर यांनी आव्हान दिले होते.याची सुनावणी पूर्ण होऊन या प्रकरणाचा निकाल सरपंच करिष्मा मुजावर यांच्या बाजूने लागला आहे. व समाजकल्याण विभागाने दाखला व्हॅलेडीटी करून दिलेला आहे.यामुळे त्यांचे सरपंच पद अबाधित राहिले आहे. अशी माहिती रुई ग्रामपंचायत कडून देण्यात आली आहे.
Previous Articleजैवविविधता, हेरिटेज वास्तू पर्यटनासाठी पूरक
Next Article प्लास्टिक बेततंय मुक्या प्राण्यांच्या जिवावर









