कोल्हापूर :
कळंबा कारागृहातील मुलाखत कक्षाबाहेर कैद्यांच्या दोन गटात राडा झाला. कैदी अतर सतिश माने याला डोक्यात दगड घालुन ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान हा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या महिला तुरुंग अधिकारी स्वाती लक्ष्मण जाधवर (वय 41, रा. सुभेदार बिल्डिंग कळंबा कारागृह, कोल्हापूर) यांना ढकलून दिल्याने त्या किरकोळ जखमी झाल्या. याप्रकरणी जाधवर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कैदी करण राजेंद्र पुरी, व्यंकटेश उर्फ विकी संजय जगदाळे, ओम मंगेश माने यांच्या विरोधात जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, कळंबा मध्यवर्ती कारागृहातील मुलाखत कक्षामध्ये सोमवारी सायंकाळी कैद्यांच्या मुलाखतीचे काम सुऊ होते. यावेळी मुलाखत संपवून अमर माने जात होता. यावेळी पूर्ववैमस्यातून कैदी व्यंकटेश उर्फ विकी जगदाळे आणि त्याचा साथिदार ओम माने हे शिवीगाळ कऊ लागले. दरम्यान कैदी करण पुरी त्या ठिकाणी आला. त्याने माने याला मारहाण करण्यास सुऊवात केली. तर व्यंकटेश जगदाळे आणि ओम माने यांनी त्याच्या डोक्यात दगड घालुन त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात अमर माने गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. यावेळी महिला तुऊंग अधिकारी स्वाती जाधवर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोर तिघा कैद्यांनी त्यांनाही ढकलुन दिल्याने त्या किरकोळ जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी त्वरित कारागृहातील ऊग्णालयात दाखल केले आहे.








