बेलग्रेड (सर्बिया)
रविवारी येथे झालेल्या एटीपी टूरवरील सर्बिया खुल्या पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत रशियाच्या आंद्रे रूबलेव्हने एकेरीचे जेतेपद पटकाविताना सर्बियाच्या टॉप सीडेड जोकोविचचा पराभव केला.
या स्पर्धेतील अंतिम सामन्यात रूबलेव्हने जोकोविचचा 6-2, 6-7 (4-7), 6-0 असा पराभव करत अजिंक्यपद पटकाविले. हा अंतिम सामना अडीच तास चालला होता. एटीपी 250 दर्जाच्या या क्लेकोर्ट टेनिस स्पर्धेत जोकोविचला शेवटच्या सेट्समध्ये एकही गेम जिंकता आला नाही. 2022 च्या टेनिस हंगामात एटीपी टूरवरील अधिक स्पर्धा जिंकणाऱया स्पेनच्या नदालच्या विक्रमाशी रूबलेव्हने बरोबरी साधली आहे. रूबलेव्हने यापूर्वी मार्सेली आणि दुबई येथील टेनिस स्पर्धा जिंकल्या आहेत.









