वृत्तसंस्था/ दोहा
एटीपी टूरवरील येथे झालेल्या कतार खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत रशियाच्या आंद्रे रुबलेव्हने एकेरीचे जेतेपद मिळविताना ड्रेपरचा पराभव केला. रुबलेव्हने ही स्पर्धा दुसऱ्यांदा जिंकली आहे.
या स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात रुबलेव्हने जॅक ड्रेपरचा 7-5, 5-7, 6-1 अशा सेट्समध्ये पराभव करत जेतेपद हस्तगत केले. गेल्या 3 दिवसांच्या कालावधीमध्ये रुबलेव्हने या स्पर्धेत 3 सेट्समधील जिंकलेला हा तिसरा सामना आहे. यापूर्वी रुबलेव्हने ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स डी. मिनॉरचा तर त्यानंतर कॅनडाच्या फेलिक्स अॅलिसीमेचा 3 सेट्समध्ये पराभव केला होता. आता या विजयामुळे रुबलेव्हचे एटीपी मानांकनातील स्थान निश्चितच वधारेल.









