आरटीओ शिवानंद मगदूम यांची माहिती : ऑनलाईनवर भर : कोरोना काळातील कसर भरून काढण्याचा प्रयत्न
प्रतिनिधी /बेळगाव
संभाव्य चौथी लाट येईल व ती थोपविण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान कोरोनामुळे आरटीओच्या करातही मोठी घट झाली होती. मात्र 2021-22चे उद्दिष्ट आरटीओने पूर्ण केले आहे, तर 2022-23 सालातील पहिल्या दोन महिन्याचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. त्यामुळे येत्या आठ महिन्यात देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण होईल, असे आरटीओ शिवानंद मगदूम यांनी सांगितले.
दरम्यान, मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे अनेक उद्योगधंद्यांना फटका बसला आहे. यामध्ये सरकारी कार्यालयेही अपवाद नाहीत. मात्र सर्वाधिक महसूल जमा करून देणाऱया आरटीओ कार्यालयाला आता 2022-23 सालाचे उद्दिष्ट जाहीर करण्यात आले आहे. बेळगाव आरटीओ विभागाला 15136.61 लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी आता आरटीओ विभागाने दोन महिन्याचे 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले असून आता उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अधिकाऱयांची धडपड सुरू
आहे.
कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगाला हादरा बसला आहे. बेळगावातही अनेक उद्योगधंद्यांनाही चांगलाच फटका बसला असून आता काही प्रमाणात आर्थिक घडी बसत आहे. कोरोनाच्या तिसऱया लाटेचा प्रभाव अधिक तीव्र नसल्याने उद्योगधंद्यांना चालना मिळत आहे. बेळगाव आरटीओ विभागाला कोरोना काळात कोटींचा फटका बसला होता. त्यामुळे ही कसर भरुन काढण्याचे मोठे आव्हान अधिकाऱयांसमोर उभे ठाकले होते. कोरोनाचे कधी एकदा उच्चाटन होते, असेच साऱयांना वाटू लागले आहे. असे असले तरी आरटीओ कार्यालयातील महसूल गोळा करण्यामध्ये मागील वषी 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे.
2021-22 सालाचे उद्दिष्ट पूर्ण करून अधिक महसूल गोळा केला होता. आता यावषीही दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अधिकाऱयांना सूचना केल्या आहेत. बेळगाव तालुक्मयातील वाहनांच्या खरेदीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली असून आरटीओ कार्यालयात नोंदही होत आहे. अनेक वाहनांचे थकीत करही भरण्यात येत असल्यामुळे महसुलात भर पडत आहे. दरवषी बेळगाव आरटीओ कार्यालयात कोटींहून अधिक कर मिळत असतो. बेळगाव शहरातील व खानापूर तालुक्मयात वाहने घेण्याकडे कल वाढल्याने महसुलात वाढ होत आहे. आता दोन महिन्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले असून एप्रिलमध्ये 126.36 टक्के तर मे महिन्यात 100.02 टक्के महसूल जमा झाला आहे.









