कोची
केरळमधील पलक्कड येथे शनिवारी दिवसाढवळय़ा आरएसएस कार्यकर्ता श्रीनिवासन (45) यांची हत्या करण्यात आली. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी श्रीनिवासन यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. हल्ल्यावेळी ते आपल्या दुकानात बसले होते. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वाटेत असतानाच उपचारापूर्वी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या हत्येमागे पीएफआयचा हात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. दिवसाढवळय़ा झालेल्या या हत्येच्या घटनेनंतर शहरातील सुरक्षा कडेकोट करण्यात आली. तसेच तपासनाके सतर्क करून हल्लेखोरांचा शोध घेण्यात आला. मात्र, हल्लेखोर उशिरापर्यंत सापडू शकले नव्हते.









