ऑनलाईन टीम / तरुण भारत :
RSS HQ, senior BJP leader targeted by PFI टेरर फंडिंगप्रकरणी एनआयएने पॉप्युलर प्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) देशभरातील अनेक कार्यालयांवर छापेमारी करत 106 जणांना ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्र एटीएसने केलेल्या चौकशीदरम्यान PFI च्या निशाण्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूरमधील मुख्यालय आणि भाजपचे ज्येष्ठ नेते असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
इस्लामिक संघटना म्हणून नावारूपास आलेल्या पीएफआय या संघटनेशी संबंधित कार्यालय, व्यक्ती आणि महत्वपूर्ण ठिकाणांवर गुरुवारी सकाळी राष्ट्रीय गुप्तचर तपास यंत्रणा आणि स्थानिक पोलिसांनी देशभरात 12 राज्यात एकाचवेळी छापे टाकले होते. संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह 106 जणांना ताब्यात घेतले होते. महाराष्ट्र एटीएसने केलेल्या चौकशीदरम्यान पीएफआयकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर मुख्यालयाची आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची सर्व माहिती गोळा करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अधिक वाचा : राणेंच्या ‘अधीश’ बंगल्यावर हातोडा पडणार, सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली
PFI च्या ताब्यात घेतलेल्या लोकांच्या चौकशीतून आणखी काही खुलासे होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने एटीएसकडून तपास सुरू आहे.