Mohan Bhagwat : “संघ लोकप्रिय झाला तर लोक संघाकडे ही सत्ता सोपवायला मागे पुढे पाहणार नाहीत.मात्र,संघ तसे करणार नाही,म्हणजेच संघ कधीही सत्ताकारणात येणार नाही.कोणत्याही संघटनेला दीर्घकाळ कार्यरत राहायचे असल्यास त्या संघटनेतील नेते आणि कार्यकर्ते दोघांनी दक्ष राहून काम करणे गरजेचे असते,”
“स्टेटस आणि कन्फर्ट” या दोन गोष्टी कोणत्याही संघटनेसाठी आपत्ती ठरतात. स्टेटसला प्रेम करणारा नेता आणि कन्फर्ट ला प्रधान्य देणारे कार्यकर्तेच संघटनेचा बट्ट्याबोळ करतात,” असे डॉ. मोहन भागवत यांनी सांगितले.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राजकारणात उतरणार का? असा सवाल अनेक वेळा विचारण्यात येतो,याला सरसंघचालक मोहन भागवत यांनी उत्तर दिले. ते काल (मंगळवारी) विदर्भ साहित्य संघाच्या शतक महोत्सवी वर्षा निमित्ताने आयोजित व्याख्यानमालेत बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, “देश सक्षम झाला पाहिजे हेच संघाचे प्रयत्न राहिले आहेत. याच विचारातून 97 वर्षांपूर्वी संघ सुरू झाला होता. एक नेता, एक संगठन, एक पक्ष खूप मोठे बदल घडवू शकत नाही. परंतु, सामान्य माणूस उभा राहतो तेव्हाच मोठे बदल घडतात.”असेही ते म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








