ऑनलाईन टीम/तरुण भारत
भारतात मुला-मुलींसाठी लग्नाचं नेमकं वय किती असावं? यावर गेल्या काही वर्षांमध्ये चर्चा घडून आल्याचं पाहायला मिळालं आहे. विशेषत: देशातील बालविवाहांना आवर घालण्याच्या संदर्भात या मुद्द्यावर नेहमीच दावे-प्रतिदावे केले जातात. डिसेंबर २०२१मध्ये मोदी सरकारने मुलींसाठी लग्नाचं वय १८ वरून २१ करण्यासंदर्भातलं विधेयक संसदेत मांडलं. विरोधी पक्षांच्या विरोधामुळे हे विधेयक स्थायी समितीकडे पाठवण्यात आलं आहे. एकीकडे ही चर्चा सुरू असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं मात्र मोदी सरकारच्या भूमिकेशी असहमती दर्शवली आहे.
आरएसएसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले,“सध्या मुलींच्या लग्नाच्या वयाचा मुद्दा चर्चेत आहे.यावर अनेक मान्यता आहे. आदिवासी किंवा ग्रामीण भागात लग्न लवकर होतात. यामागील कारण म्हणजे सरकारी शिक्षण आणि लवकर गर्भधारणा. अशा प्रकरणांमध्ये सरकारने किती हस्तक्षेप करायचा हा महत्त्वाचा प्रश्न आहे. काही गोष्टी समाजावर सोडल्या पाहिजेत.”
देशातील मुलींसाठी लग्नाचे कायदेशीर वय १८ वरून २१ वर्षे करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे यासाठी सरकार सध्याच्या कायद्यांमध्ये सुधारणा करणार आहे.