केंद्र सरकारने बुधवारी 2023- 24 हंगामासाठी उसाच्या रास्त किमतीतमध्ये म्हणजेच एफआऱपीमध्ये (FRP) 10 रुपये प्रतिक्विंटलची वाढ करून ती सध्या 315 / क्विंटल केली असल्याची माहिती केंद्रिय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. त्यामुळे उसाला आता एफआरपीनुसाक प्रतिटन 3150 रुपये मिळणार आहे.
कृषी मूल्य आयोगाने केलेली शिफारस मंत्रिमंडळाने केले मान्य केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गतवर्षी उसाची एफआरपी ३०५ रुपये प्रतिक्विंटल होती. उसाची सव्वा दहा पेक्षा अधिक रिकव्हरी असेल तर पुढील एक टक्का रिकव्हरीला शेतकऱ्याला 307 मिळणार जादा मिळणार आहे. या निर्णयानंतर एफआरपी वाढवला…आता साखरेचे दरही वाढवा…अशी मागणी साखर कारखानदारांनी उचलून धरली आहे.
या निर्णयामुळे देशातील 5 कोटी ऊस उत्पादक शेतकरी तसेच साखर कारखानदार आणि संबंधित उद्योदधंद्यामध्य़े कार्यरत असलेल्या 5 लाख कामगारांना फायदा होणार असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. पुढे बोलताना त्यांनी सांगितले कि, सरकार शेती आणि शेतकर्यांच्या हिताला प्राधान्य देत असून आणि एफआरपीमधील ही वाढ त्यांना पाठिंबा दर्शवत आहे. 2014-15 हंगामातील 210 रुपये प्रति क्विंटलवरून 2023-24 हंगामासाठी सध्याच्या 315 रुपये प्रति क्विंटलपर्यंत FRP गेल्या काही वर्षांत सातत्याने वाढ झाली असल्य़ाचेही त्यांनी सांगितले.