एस एस राजामौली यांचा ‘आर आर आर’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला जनतेकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. राजामौली यांचे चित्रपट भारतीय संस्कृती दर्शवणारे, भव्य सेट, कथा आणि ग्राफिक्ससाठी ओळखले जातात. त्यांचा ‘बाहुबली’ नावाचा चित्रपट देशातील सर्वात मोठा आणि यशस्वी चित्रपट मानला गेला आहे. ‘आर आर आर’ या चित्रपटात दोन क्रांतिकारक तरुण राम म्हणजेच रामचरण आणि भीम म्हणजेच ज्युनिअर एनटीआर भारतातील ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढत असतात. त्यामध्ये दाखवलेल्या त्यांच्या संघर्षामुळे आणि मैत्रीमुळे या चित्रपटाने जनतेच्या मनात घर केले आहे.
मूळतः तेलगुमध्ये प्रदर्शित झालेला ‘आर आर आर’ हा चित्रपट भारतातील महागडय़ा चित्रपटांपैकी एक आहे आणि तो पूर्ण भारतभर तब्बल दहा भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट मागच्या वषी आला असला तरीही अजूनही जनतेमध्ये चर्चेत आहे आणि तेही एका खास कारणासाठी. हॉलीवुडमध्ये आयोजित गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा हा जागतिक चित्रपट उद्योगातील सर्वात प्रति÷ित पुरस्कार सोहळय़ांपैकी एक आहे. जानेवारी 1944 मध्ये स्थापित झालेल्या या पुरस्कार संघामध्ये आज जगभरातील 105 सदस्य आहेत. हा पुरस्कार अतिशय प्रति÷sचा आहे कारण ज्या चित्रपटांनी हा पुरस्कार जिंकला त्यांचे काम आणि कौशल्य जगभर ओळखले जाते.
हा चित्रपट आज गाजत आहे याचे कारण या चित्रपटातील नाटू या गाण्याला सर्वश्रे÷ मूळ संगीताचा पुरस्कार मिळाला आहे. या संघाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच भारताने हा पुरस्कार जिंकला आहे आणि म्हणूनच राजामौलीसाठी आणि भारतासाठी हा एक ऐतिहासिक क्षण मानला गेला आहे. या गाण्याचे संगीत दिग्दर्शक एम एम किरण, रामचरण, राजामौली ज्युनिअर एनटीआर आणि काही इतर लोक या पुरस्कार सोहळय़ासाठी उपस्थित होते जिथे एम एम †िकरावनी आणि त्यांच्या विजयासाठी ह्रदयस्पर्शी भाषणदेखील दिले.
या गाण्याच्या चित्रीकरणाबाबत काही मनोरंजक भाग म्हणजे ते युपेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या अधिकृत निवासस्थानाबाहेर चित्रीत केले आहे. एवढेच नव्हे तर राजा मौलीने या गाण्यातील मूळ डान्स स्टेपचे 80 रिटेक घेतले होते आणि त्यामधील दुसरा टेक त्यांनी चित्रपटात वापरला. चित्रपट निर्माते आणि कलाकारांचे प्रयत्न प्रेक्षकांच्या प्रतिसादावरून दिसून येतात कारण आता प्रत्येक जण या गाण्याचा आनंद घेत आहे आणि त्याच्या तालावर नाचत आहे.
पण जिकडे प्रशंसा करणारे लोक असतात तसेच दुसरीकडे टीका करणारे लोक देखील असतात. काही लोकांच्या आणि टीकाकारांच्या मते हे गाणे आणि चित्रपट एवढय़ा लोकप्रियतेच्या पात्रतेचे नाही. पाश्चात्य कथाकथनाच्या गुणवत्तेची भारतीय कथाकथनाशी तुलना करून ते असे म्हणतात. खरे सांगायचे तर भारतात ‘आर आर आर’ हा चित्रपट इतका का गाजला हे समजून घेण्याचा ते प्रयत्न करत नाहीत. भारतीय सिनेमापेक्षा पाश्चात्य सिनेमा अधिक विकसित आणि अधिक भव्य वाटू शकतो पण खरंतर भारतीय आणि पाश्चात्य सिनेमासृष्टीची तुलना केली जाऊ शकत नाही. भारताची संस्कृती पाश्चात्य संस्कृतीपेक्षा खूप वेगळी आहे आणि भारताचा इतिहास खूप समृद्ध आहे.
भारत हा जगातील सर्वात मोठय़ा लोकशाही देशांपैकी एक आहे जिथे वेगवेगळय़ा संस्कृतीचे लोक एकाच प्रदेशात राहतात. भारतीय आपल्या धर्माशी आणि संस्कृतीशी इतके रुजलेले आहेत की ते जिथे जातात तिथे हा इतिहासाचा साठा आपल्यासोबत घेऊन जातात. आणि हीच भावना राजामौलीने आपल्या सर्व चित्रपटांमध्ये जपली आहे. त्यांचे सर्व चित्रपट भारतीय संस्कृती, पौराणिक कथा आणि इतिहासाशी निगडित आहेत म्हणूनच चित्रीकरण कितीही काल्पनिक असले तरीही प्रेक्षकांना त्यांच्या कथा खूपच आवडतात. पाश्चिमात्य लोकांनी आपल्यावर काही शतके राज्य केल्यामुळे आपण आपल्या संस्कृतीकडे आणि इतिहासाकडे दुय्यम म्हणून पाहू लागलो आहोत तर आपल्याला पाश्चात्त्य संस्कृती आणि विचार आपल्या संस्कृतीपेक्षा श्रे÷ वाटू लागले आहेत. पश्चिमेला बनवलेला स्पायडरमॅन नावाचा चित्रपट बऱयाच लोकांना आवडतो. कोळी चावल्यानंतर माणूस सुपर हिरो बनला आणि जगाला वाचवले यावर जर भारतीय विश्वास ठेवत असतील तर ‘आर आर आर’ सारख्या भारतीय चित्रपटामध्ये निर्माण झालेल्या काल्पनिक जगावर का विश्वास ठेवू शकत
नाहीत?
भारतीय चित्रपट उद्योग गेल्या अनेक वर्षांमध्ये खूप विकसित झाला आहे आणि त्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे यात काही वादच नाही. या विकासाची सुरुवात राजामौलीसारख्या तेलगू दिग्दर्शकांनी भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये केली आहे. पश्चिमात्य लोकांना वाटते की भारतीय चित्रपट उद्योगात फक्त बॉलीवूडचा समावेश आहे. पण ‘बाहुबली’, ‘आर आर आर’, ‘मी वसंतराव’ (मराठी) आणि इतर अनेक चित्रपटांमुळे भारतातील इतर प्रतिभावान चित्रपट उद्योगांना योग्य ती ओळख मिळू लागली आहे.
जेव्हा एखादा चित्रपट निर्माता चुका करतो किंवा हवा तसा चित्रपट बनवत नाही तेव्हा भारतीय प्रेक्षक चटकन त्याच्या चुका दाखवू लागतात. मग तसेच आपण भारतीय प्रेक्षक या नात्याने एखाद्या निर्मात्याच्या प्रामाणिक प्रयत्नांना पाठिंबा का देऊ शकत नाही?
सर्जनशीलता अतिशय व्यक्तिनि÷ आहे आणि प्रत्येक प्रदेशाची कथा सांगण्याची वेगळी शैली असते. एखाद्या प्रदेशात कोणत्या प्रकारचा सिनेमा प्रदर्शित होतो हे त्या प्रदेशातील समाजाच्या मानसिकतेवर आणि संस्कृतीवरही अवलंबून असते. म्हणूनच, पाश्चात्य सिनेमांची बॉलीवूडशी तुलना करणे किंवा बॉलीवूडची तेलगू/तामिळ/मराठी सिनेमाशी तुलना करणे चुकीचे आहे.
गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्ये ‘आर आर आर’ जिंकणे हे भारतीय चित्रपटांच्या जागतिकीकरणाच्या पहिल्या टप्प्यापैकी एक आहे. निदान आता लोकांना कळेल की भारतीय चित्रपटसृष्टी म्हणजे फक्त बॉलीवूड नाही.
प्रत्येक छोटय़ा गोष्टीवर टीका करण्याऐवजी आपण आपल्या देशाच्या छोटय़ा विजयांचे कौतुक केले पाहिजे. हे अधिक लोकांना नवीन रोमांचक कथा पुढे आणण्यास प्रोत्साहित करेल. कोणत्याही निर्मात्यावर सतत टीका केल्याने समाजात क्रांती नक्कीच घडणार नाही पण जर भारतभरातील निर्मात्यांचे व कलाकारांचे असेच छोटे मोठे प्रयत्न आणि विजय ओळखून ते साजरे केले तर भारतीय कला विश्व अधिक वैविध्यपूर्ण आणि मजबूत होईल. ‘आर आर आर’ ने जे साध्य केले तो भारत आणि तेलगु समुदायासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे आणि भारतीय म्हणून आपल्याला त्याचा अभिमान वाटला पाहिजे कारण सकारात्मक बदल आता फक्त काहीच पावले दूर आहे!
-श्राव्या माधव कुलकर्णी








