मुंबई
आर आर केबल यांचा आयपीओ बुधवारी पहिल्या दिवशी गुंतवणूकीसाठी खुला झाला होता. आयपीओ पहिल्या दिवशी दुपारपर्यंत 12 टक्के इतका सबस्क्राइब झाला होता. सदरचा आयपीओ 15 सप्टेंबर रोजी बंद होणार असून त्या दिवसापर्यंत गुंतवणूक करण्याची संधी असणार आहे. रिटेल गुंतवणूकदारांनी आयपीओला 19 टक्के प्रतिसाद दिला आहे. कंपनी आयपीओअंतर्गत 1964 कोटी रुपये उभारणार असून 180 कोटीचे ताजे समभाग सादर करणार आहे.









