वृत्तसंस्था/ मुंबई
या आठवड्यात शेअरबाजारात 2 कंपन्यांचे आयपीओ सादर केले जाणार आहेत. यात एक आर आर केबल लिमिटेड आणि दुसरा साम्ही हॉटेल्स लिमिटेड यांचा असणार आहे.
आरआर केबल लिमिटेड यांचा आयपीओद्वारे 1964 कोटी रुपये उभारण्याचा मानस असून 180 कोटी रुपयांचे 17,39,130 ताजे समभाग याअंतर्गत सादर केले जाणार आहेत. तसेच 1784 कोटी रुपयांचे 1,72,36,808 समभाग कंपनीच्या प्रवर्तकांकडून ऑफर फॉर सेलअंतर्गत सादर केले जाणार आहे. आयपीओ 13 सप्टेंबरला खुला होणार असून 15 सप्टेंबरपर्यंत गुंतवणूकदारांना बोली लावता येणार आहे.
साम्ही हॉटेल्सचा आयपीओ 14 सप्टेंबरला येणार
दुसरीकडे साम्ही हॉटेल्स लिमिटेडचा आयपीओ 14 सप्टेंबरला खुला होणार असून 18 सप्टेंबरला बंद होत आहे. कंपनीचा समभाग 27 सप्टेंबरला बीएसई व एनएसईवर लिस्ट होणार आहे. 119-126 रुपये प्रति समभाग अशी किमत निश्चित करण्यात आली असून रिटेल गुंतवणूकदारांना एका लॉटसाठी ज्यात 119 समभाग असतील त्याकरीता बोली लावता येणार आहे. भारतात यांची 12 शहरांमध्ये हॉटेल्स कार्यरत असल्याचे कंपनीने सांगितले आहे. दिल्ली, बेंगळूर, हैदराबाद, चेन्नई आणि पुणे यासोबत एकंदर 12 शहरात यांचे हॉटेलचे जाळे आहे.
कधी होणार लिस्ट
समभाग 26 सप्टेंबर रोजी एनएसई आणि बीएसईवर लिस्ट होणार आहे. आयपीओची इशु किंमत 983-1035 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. 1035 या किमतीप्रमाणे 14 समभागांच्या एका लॉटमध्ये गुंतवणूक करण्याची संधी असणार आहे.









