सांगली(आटपाडी)
वाळूसाठी चक्क स्मशानभूमी उध्दवस्त करण्याचा प्रकार पुन्हा एकदा आटपाडीमध्ये उजेडात आला आहे. आटपाडीतील शुक ओढ्यातील अल्पसंख्याक समाजाच्या स्मशानभूमीतून चक्क मृतदेहाचे सांगाडे बाहेर काढून चाळू चोरी करण्यात आली आहे. या प्रकरणात निद्रिस्त बनलेल्या महसूल प्रशासना वेधण्यासाठी स्मशाभूमीत जळणाऱ्या चितेच्या साक्षीने हलगी वाजवून निषेध करण्यात आला.
आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांच्या सह कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. आटपाडी तालुक्यात महसूल व पोलीस प्रशासनाच्या आशिर्वादाने बेसुमार वाळू चोरी सुरू आहे. दिवसेंदिवस या प्रकारात वाढ हात आहे. त्याकडे महसूल विभागाकडून पुर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आरपीआयकडून करण्यात येत आहे. त्यामुळे वाळूचोरी करणाऱ्यांचे प्रस्थ वाढले असून शिवाय महसुलच्या हप्तेखोरीची व्याप्तीही वाढली आहे. असा आरोप आरपीआयने केला. आटपाडीतील अल्पसंख्याक समाजाची स्मशानभूमी लुटुन त्यातील पुरलेले मृतदेहाचे सांगाडे, हाडे बाहेर काढले आहे. मृतदेहांची विटंबना करून वाळू चोरीच्या प्रकारामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे वेळीच याकडे लक्ष देऊन वाळू तस्करांना रोखावे, अन्यथा तीव्र आंदोलनांचा इशारा आरपीआयने दिला आहे.