बेळगाव : एसकेई संस्थेच्या राणी पार्वती देवी कला व वाणिज्य महाविद्यालय आयोजित क्रिकेट स्पर्धेत पुऊष गटात पी. टी. उषा संघाने मेजर ध्यानचंद संघाचा 47 धावांनी तर महिला गटात मिल्खा सिंग संघाने पी. व्ही. सिंधू संघाचा 20 धावांनी पराभव करून आरपीडी चषक पटकाविला. आरपीडी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित केलेल्या आंतर क्लब क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पी. टी. उषा संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकांत 1 गडी बाद 127 धावा केल्या. त्यात रोहित गोजगेने 3 षटकार, 5 चौकारांसह 55 तर मल्लूने 2 षटकार, 4 चौकारांसह 46 धावा केल्या. मेजर ध्यानचंद संघातर्फे प्रज्वलने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना मेजर ध्यानचंद संघाने 8 षटकात 5 गडीबाद 80 धावाच केल्या. त्यात प्रज्वलने 2 षटकार, 5 चौकारांसह 38 धावा केल्या. पी. टी. उषातर्फे सुमीतने 3 गडी बाद केले. महिलांच्या अंतिम सामन्यात मिल्खा सिंग संघाने प्रथम फलंदाजी करताना 5 षटकांत 2 गडी बाद 56 धावा केल्या. त्यात टिना वानखेडेने 7 चौकारांसह 38 धावा केल्या. तर प्रत्युत्तरादाखल खेळताना पे. व्ही. सिंधू संघाने 5 षटकांत 4 गडीबाद 36 धावा केल्या. त्यात सारिकाने 22 धावा केल्या. मिल्खा सिंगतर्फे टिनाने 3 गडी बाद केले.या स्पर्धेत मिल्खा सिंग, पी. टी. उषा, मेजर ध्यानचंद, मेरीकॉम, पी. व्ही. सिंधू व सचिन तेंडुलकर या संघाचा समावेश होता. या संघादरम्यान साखळी पद्धतीचे सामने खेळविण्यात आले.
विजेत्या संघांचे कौतुक
विजेत्या संघांचे आरपीडी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनुजा नाईक, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. रामकृष्णन एम., विद्यार्थी मंडळ उपाध्यक्ष प्रा. प्रसन्ना जोशी, डॉ. अभय पाटील यांनी कौतुक केले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालय क्रीडा प्रतिनिधी अनुष्का शंकर शर्मा व अक्षय कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.









