वृत्तसंस्था/ चेन्नई
आराम्ंादायी मोटरसायकलची श्रेणी सादर करणारी रॉयल इनफिल्ड आपली पहिलीवहिली इलेक्ट्रिक बाईक 2025 मध्ये बाजारात उतरवणार असल्याची माहिती आहे. आयशर मोटर्सचा हिस्सा असलेली कंपनी रॉयल इनफिल्डचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ सिद्धार्थ लाल यांनी ही माहिती दिली आहे.
सध्याला बाईक सादरीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या चाचण्या कंपनी प्रायोगिक तत्वावर आपल्या कारखान्यामध्ये करते आहे. पेट्रोलवर चालणाऱ्या बाईक्स तर येणाऱ्या काळात कंपनीकडून आणल्या जातीलच पण आता इ बाईक्सकरीताही आगामी काळात प्रयत्न होणार आहेत. या व्यवसायाकरीता आवश्यक गुंतवणूकीसाठी आपल्याकडे पुरेसे भांडवल असल्याने नव्याने निधी उभारणीची कंपनीची कोणतीही योजना नसल्याचेही सिद्धार्थ लाल यांनी सांगितले.









