नवी दिल्ली :
आयशर मोटर्स लिमिटेडच्या रॉयल एनफिल्ड मोटरसायकलची विक्री ऑक्टोबरमध्ये 31 टक्क्यांनी वाढून 1,10,574 युनिट्सवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी 84,435 युनिट्सची विक्री झाली होती, असे कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
आयशर मोटर्सने सांगितले की, गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय विक्री 8,688 युनिट्सवर होती, जी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये 3,477 युनिट्सची होती. 350 सीसी पर्यंत इंजिन क्षमता असलेल्या मॉडेल्सची विक्री गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये 76,075 युनिट्सच्या तुलनेत यावर्षी 27 टक्क्यांनी वाढून 96,837 युनिट्सवर गेली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, 350 सीसीपेक्षा जास्त इंजिन क्षमता असलेल्या मॉडेल्सची विक्री ऑक्टोबर 2023 मध्ये 8,360 युनिट्सवरून गेल्या महिन्यात 64 टक्क्यांनी वाढून 13,737 युनिट्स झाली आहे.









