वृत्तसंस्था/नवीदिल्ली
आयशर मोटर्स यांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या रॉयल इनफिल्डने डिसेंबरच्या तिमाहीमध्ये विक्रमी दुचाकी विक्री करण्यामध्ये यश मिळविले आहे. कंपनीने आर्थिक 2025 च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये 269039 मोटारसायकलींची विक्री करण्यामध्ये यश मिळविले आहे. याच दरम्यान कंपनीने तिमाहीचा निकाल जाहीर केला असून 1170 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कंपनीने प्राप्त केला आहे. मागील वर्षी कंपनीने याच तिमाहीत 996 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला होता. मागच्या वर्षाच्या तुलनेत कंपनीने 17 टक्के वाढ नफ्यात नोंदविली आहे. मोटारसायकलींची मजबुत मागणी, नव्या मॉडेल्सचे सादरीकरण त्याचप्रमाणे मोटारसायकलींचे वेळेत वितरण यापार्श्वभूमीवर कंपनीने सदरच्या तिमाहीत चांगली कामगिरी पार पडली आहे. हंटर 350 या कंपनीच्या मोटारसायकलला देशासह विदेशातही ग्राहकांनी चांगला प्रतिसाद नेंदवला आहे. याच मोटारसायकलीची विक्री 5 लाखांचा टप्पा पार करु शकली आहे. कंपनीने सदरच्या तिमाहीत 19 टक्के वाढीसह 4973 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. मागच्यावर्षी हेच उत्पन्न 4 हजार 178 कोटी रुपये होते. तिमाही आधारावर पाहता कंपनीने 16 टक्के वाढीसह 4973 कोटी रुपयांचा महसुल प्राप्त केला आहे.









